Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 माझ्या दुःखाचा निश्चित अंत का होत नाही आणि माझ्या जखमा त्रासदायक आणि असाध्य का आहेत? तुम्ही मला एका फसविणाऱ्या झऱ्यासारखे आहात, जणू एखादा बिनपाण्याचा ओढा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:18
15 Iomraidhean Croise  

समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते;


माझा पक्ष खरा असता मी खोटा ठरलो आहे; मी निरपराध असता माझा घाय असाध्य आहे.’


माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार?


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे ह्याकरताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?


हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.


कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे.


तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे; तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत; म्हणून मी तुला हे सर्व केले आहे.


म्हणून तुला मोरेशेथ-गथ सोडून जाताना देणगी द्यावी लागेल; अकजीबाची घरे इस्राएलाच्या राजांना फसवणारी होतील.


कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan