Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुमच्याविरुद्ध पेटला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन. कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:14
18 Iomraidhean Croise  

तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील.


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याचा पुत्र मनश्शे ह्याने यरुशलेमेत जे काही केले त्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन.


ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


आणि मी तुम्हांला दिमिष्काच्या पलीकडे बंदिवान करून नेईन,” असे परमेश्वर म्हणतो; सेनाधीश देव हे त्याचे नाम आहे.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेईल, आणि तेथे तू काष्ठपाषाणाच्या अन्य देवांची सेवा करशील;


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan