Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:8
25 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?


मी संकटांतून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; माझ्या वैर्‍यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले,


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.


परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे;


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो.


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस.


बोला, त्यांना समोर आणा; त्यांना आपापसांत विचार करू द्या; हे कोणी पूर्वीपासून कळवले? हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? माझ्यावेगळा देव नाही; माझ्यावाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही.


कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.


ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले; कारण इस्राएलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.”


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


त्या म्हातार्‍याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. म्हातार्‍याने त्याला विचारले, “तू कोठे निघालास? तू कोठून आलास?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan