Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर; आमचे कितीदा पतन झाले आहे! तुझ्याविरुद्ध आम्ही पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:7
30 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस, आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत; आज तुझ्यापुढे आमची स्थिती अशीच आहे; आम्ही तुझ्यापुढे अपराधी आहोत; ह्यामुळे तुझ्यासमोर कोणाला उभे राहता येत नाही.”


हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.


हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे.


हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.


माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.


कारण आमचे अपराध तुझ्यासमोर बहुत आहेत; आमची पातके आमच्याविरुद्ध साक्ष देतात; आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्ये आम्हांला ठाऊक आहेत.


हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.”


तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”


ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला.


तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.


ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली.


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी आपला हात आवरला; माझ्या नामासाठी अशी कृती मी केली.


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो, म्हणून इस्राएल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील, यहूदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल.


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.


आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल? कारण तो दुर्बळ आहे.”


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.


त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.


पण शत्रूच्या खिजवण्याला मी भ्यालो; त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता; ते म्हणाले असते की, ‘आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे.’


कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan