Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात, म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:3
23 Iomraidhean Croise  

दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.


राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, “अरेरे! माझ्या पुत्रा अबशालोमा! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”


काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.


हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या; आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलाचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदांचे पाणी प्या;


मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.


पण त्यांच्या आशेची निराशा झाली; तेथे पोचून ते फजीत झाले.


माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील. झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरतील.


जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत.


पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकूळ झाली आहे; म्हणून शेतकरी फजीत होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत.


मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.


तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


तान्ह्या मुलाची जीभ तृषेमुळे त्याच्या टाळूस चिकटते; लहान मुले भाकर मागतात, पण त्यांना ती मोडून देण्यास कोणी नाही.


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे; तुझा सोस लागून ते धापा टाकत आहेत; पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत; अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.


“कापणीला अद्यापि तीन महिने आहेत तोच पाऊस तुमच्याकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरला; तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले; एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही; ते सुकून गेले.


दोन-तीन गावे पाणी पिण्यासाठी एका गावात पडत-झडत गेली, त्यांची तृप्ती झाली नाही; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांच्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan