Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय? जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:22
39 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”


पुष्कळ दिवस लोटल्यावर, तिसरे वर्ष लागले तेव्हा एलीयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे.”


तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, ह्यांच्या पापांची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर.


त्याने पर्जन्यास नियम लावून दिला; गर्जणार्‍या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला;


तो पृथ्वीतलास उदक देतो, शेतांना पाणी पाठवतो;


मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो.


तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.


तो मेघांनी आकाश आच्छादतो; तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो, डोंगरांवर गवत रुजवतो.


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात.


परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.


त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले.


तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो; तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो.


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


‘जो परमेश्वर आमचा देव आम्हांला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू,’ असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.


तो आपला शब्द उच्चारतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो; व आपल्या भांडारांतून वायू बाहेर काढतो.


ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’


सीयोनपुत्रहो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठायी उल्लास करा, हर्ष करा; कारण तुम्हांला हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस1 तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.


“कापणीला अद्यापि तीन महिने आहेत तोच पाऊस तुमच्याकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरला; तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले; एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही; ते सुकून गेले.


ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.


मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.


अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.


परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील, व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल; तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही.


देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan