Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 “काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारले आहे का? तू सियोनचा राग करतोस काय? बरे न होण्या इतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. आणि बरे होण्याची वाट पाहिली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:19
26 Iomraidhean Croise  

पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


मी सौख्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा विपत्ती आली; मी प्रकाशाची अपेक्षा करीत होतो तेव्हा अंधकार आला.


हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला;


तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास.


पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही


“मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.


माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?


कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे.


तुझी दाद लावणारा कोणी नाही; तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही.


कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध केलेल्या अपराधांनी त्याचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास त्यांचा देव, सेनाधीश परमेश्वर ह्याने सोडले नाही.


त्यांना टाकाऊ रुपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यांना टाकले आहे.”


हे सीयोनकन्ये, आपला केशकलाप काढून फेकून दे, उजाड डोंगराच्या शिखरांवर विलाप कर, कारण आपल्या क्रोधास पात्र झालेल्या ह्या पिढीस परमेश्वराने धिक्कारले व टाकून दिले आहे.’


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी माझ्याकडे चोहोकडून बोलावल्या; परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही; ज्यांचे मी लालनपालन केले, त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडवला आहे.”


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस.


कारण परमेश्वरापासून यरुशलेमेच्या वेशीवर संकट आले म्हणून मारोथाची रहिवासीण कल्याण होण्याच्या उत्कंठेने स्फुरण पावत आहे.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan