Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर मी रानात बाहेर गेलो तर पाहा, तीथे तलवारीने मारले गेलेले आहेत. आणि जर मी शहराजवळ आलो तर पाहा! दुष्काळाने ग्रासलेले आहेत. कारण दोघेही, याजक आणि संदेष्टे ज्ञान नसल्याने भटकत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:18
19 Iomraidhean Croise  

हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्‍या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत.


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.


“मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला;


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.


मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.


ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.


हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे.


ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर; प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत; तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर.


क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.


बाहेर तलवार, आत मरी व दुष्काळ; शेतात असलेला तलवारीने मरेल, नगरात असलेल्यास दुष्काळ व मरी ग्रासून टाकतील;


“मी तर तुम्हांला तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली, व तुमच्या सर्व स्थानांत भाकरीची वाण पाडली, तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


तुला अथवा तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा एका राष्ट्राकडे परमेश्वर तुला व तू आपल्यावर नेमलेल्या राजाला नेईल, आणि तेथे तू काष्ठपाषाणाच्या अन्य देवांची सेवा करशील;


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan