Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरूशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:16
23 Iomraidhean Croise  

म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;


तुझे पुत्र मूर्च्छित झाले आहेत, पाशात सापडलेल्या हरिणाप्रमाणे रस्त्यांच्या नाक्यानाक्यांनी ते पडले आहेत; ते परमेश्वराच्या क्रोधाने, तुझ्या देवाच्या धमकीने ग्रासले गेले आहेत.


ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”


परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”


तुझे वर्तन व तुझी कर्मे ह्यांमुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे; तुझ्या हृदयास ती भिडली आहे.”


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा.


हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्‍याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’


हे काम नेहमी करणारे इसम ते वेगळे करून नेमतील आणि देश शुद्ध व्हावा म्हणून ते इसम देशभर हिंडून जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांना पुरतील; सात महिने लोटल्यावर ते शोधाला लागतील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan