Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ह्यास्तव ज्या संदेष्ट्यांना मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, ह्या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठवले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात या देशावर तलवार व उपासमार येणार नाही. ते संदेष्टे तलवारीने आणि उपासमारीने मरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:15
26 Iomraidhean Croise  

मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”


हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”


ह्यामुळे पाहा, जे संदेष्टे एकमेकांपासून माझी वचने चोरून घेतात त्यांच्याविरुद्ध मी आहे.


परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन; द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील; पानेही वाळून जातील; म्हणून जे काही मी त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल.”


मी आपल्या वल्लभांना बोलावले, पण त्यांनी मला दगा दिला आहे; आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधता शोधता माझे याजक व माझे वडील जन नगरात मेले.


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


तुम्ही कच्चा चुना लिंपलेला तट मी पाडून जमीनदोस्त करीन, म्हणजे त्याचा पाया उघडा पडेल; तट पडेल व तुम्ही त्याच्याबरोबर नष्ट व्हाल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी आपला संतापाचा कहर त्या तटावर व त्याला कच्चा चुना लिंपणार्‍यांवर गुदरवीन; तेव्हा मी तुम्हांला म्हणेन, तट व त्याचा कच्चा चुना लिंपणारे नष्ट झाले आहेत.


निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.


प्रश्‍न करणार्‍याचा जसा दोष तसाच त्या संदेष्ट्याचाही दोष; ते दोघे आपल्या दोषांचे फळ भोगतील;


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


पण जर पहारेकर्‍याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्‍याजवळ मागेन.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan