Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, पाहा, संदेष्टे त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हांला दुष्काळ गाठणार नाही; तर ह्या स्थळी मी तुम्हांला खरी शांती देईन.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तलवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हास या ठिकाणी खरी सुरक्षितता देत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:13
17 Iomraidhean Croise  

त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”


हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”


ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.


संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.


इस्राएल घराण्यात ह्यापुढे निरर्थक दृष्टान्त व खूश करणारा शकुन सांगणार नाहीत.


कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan