Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:27
32 Iomraidhean Croise  

ते बडबड करतात, उद्धटपणे बोलतात, सर्व दुष्कर्मी फुशारकी मारतात;


अहो पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या; मूर्खांनो, तुम्ही कधी शहाणे व्हाल?


“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?


मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातलीस, तेथेच यज्ञ करण्यास तू वर चढून गेलीस.


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


माझ्याशी कपटाने वागणार्‍या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर.


ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला.


तू ही दुष्कर्मे केल्यावर (प्रभू परमेश्वर म्हणतो, तुला धिक्कार असो! तुला धिक्कार असो!) असे झाले की,


तो त्याने माझ्यापुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत ह्यांविषयीचा लेख होता.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका.


तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.


प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


हे शोमरोना, तुझ्या वासरांचा त्याला वीट आहे; त्यांच्यावर माझा राग पेटला आहे; त्यांना निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल!


ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो!


“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्‍या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्‍या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan