Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:21
17 Iomraidhean Croise  

मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.”


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.


हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.


आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’


अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


कोणा पुरुषास प्रसववेदना होत आहेत की काय, हे विचारा; पाहा, प्रत्येक पुरुष प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे कंबरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे असे माझ्या दृष्टीस का पडत आहे?


पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.


तू आपल्या वधणार्‍यासमोर ‘मी देव आहे,’ असे म्हणशील काय? घायाळ करणार्‍याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस.


पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan