Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:18
30 Iomraidhean Croise  

तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे ह्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला; बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले.


त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले.


तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.


त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या1 बखरीत लिहिले आहे.


त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला.


मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.


आणि तलम सणाचा मंदिल, तलम सणाचे सुंदर फेटे, कातलेल्या तलम सणाचे चोळणे,


कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?


शिरोभूषणे, साखळ्या, कंबरपट्टे, अत्तरदाण्या व ताईत,


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


“परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याचा पुत्र कोन्या2 माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन.


मी तुला व तुला जन्म देणार्‍या तुझ्या आईला तुमची जन्मभूमी नव्हे अशा देशात फेकून देईन; तेथे तुम्ही मराल.


यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठवले.


ती सर्व वचने ऐकल्यावर ते भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारुखाला म्हणाले, “आम्ही ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू.”


सीयोनकन्येचे सर्व तेज गेले आहे; तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत; ते पाठलाग करणार्‍यापुढून हतबल होऊन पळाले आहेत.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.


आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत.


मी तुझ्या नाकात नथ घातली, कानांत बाळ्या घातल्या, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण घातले.


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, शिरोभूषण उतरव. मुकुट काढून टाक; काहीच कायम राहणार नाही; जे नीच ते उंच होईल आणि जे उंच ते नीच होईल.


उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”


तुम्ही आपल्या डोक्यांस शिरोभूषणे घालाल, पायांत जोडे घालाल; तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकांना पाहून उसासे टाकाल.


त्यांनी आपल्या डोक्यात तागाची पागोटी घालावीत; त्यांनी कंबरेस तागाचे चोळणे घालावेत; त्यांनी घाम येण्यासारखे कंबरेस काही वेष्टू नये.


पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले.


निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.


ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय;


प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.


म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan