Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याने अंधकार पसरविण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्याआधी, आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करून ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, अंधारलेल्या डोंगरावर तुमची पावले अडखळण्याआधी, तुम्ही प्रकाशाची आशा कराल, पण ते त्यास गहन अंधकारात आणि निबिड काळोखात बदलतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:16
36 Iomraidhean Croise  

अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो.


काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते,


त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली.


परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले.


मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.”


दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.


मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!


त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.


ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’


ह्यामुळे अंधारातल्या निसरड्या जागांप्रमाणे त्यांचा मार्ग त्यांना होईल, ते ढकलले जाऊन त्यांत पडतील; कारण मी त्यांच्यावर अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


मी पृथ्वीकडे पाहिले तर ती वैराण व शून्य झाली आहे; आकाशाकडे पाहिले तर त्यात प्रकाश नाही.


माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.


ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.


जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन.


इत:पर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकवणार नाही, राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही, तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत ह्याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव, हे आहे.”


परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात, त्यांना धिक्कार असो! परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा ह्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन; तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते.


ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan