Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:14
30 Iomraidhean Croise  

अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अगदी कत्तल करून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले; सेइरनिवाशांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.


कारण देव त्याच्यावर मारा करील. त्याची गय करणार नाही; तो त्याच्या हातून निसटून जाण्यास पाहील.


लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील?


परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.


कारण परमेश्वर म्हणतो की : शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तलवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.”


त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडेसुद्धा पाहायचे नाहीत.


ह्यामुळे परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की द्राक्षारसपात्रांची उलथापालथ करणार्‍यांना मी त्याच्याकडे पाठवीन; ते त्याची उलथापालथ करतील, त्याच्या घागरी फोडून टाकतील.


ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही; तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन; तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझ्यामध्ये दिसेल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


मला ऐकू येईलसे तो त्या बाकीच्यांना म्हणाला, “त्याच्यामागून नगरात जा व संहार करा; कृपादृष्टी करू नका; गय करू नका,


तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जारकर्माची आहेत.


मी ह्या देशाच्या रहिवाशांवर ह्यापुढे दया करणार नाही असे परमेश्वर म्हणतो; पण मी त्यांना एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन; ते देश नष्ट करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडवणार नाही.”


भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;


तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;


परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.


इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan