Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वराने मला सांगितले, “तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कंबरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:1
9 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तीन वर्षेपर्यंत मिसर व कूश ह्यांना चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला;


इस्राएलाचे सर्व घराणे व यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे, आणि माझे नाम, स्तुती व भूषण ह्यांना कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कंबरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


“ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.”


परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,


परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.


“आपल्या हाती मोठे धोंडे घे व यहूदाच्या लोकांसमक्ष तहपन्हेस येथल्या फारोच्या राजगृहाच्या द्वाराशी जो चौक आहे त्यात ते चुना लेपून लपवून टाक;


त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’


देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan