Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्याविरूद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्याचविरूद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 12:6
25 Iomraidhean Croise  

माझे बांधव ओढ्याप्रमाणे दगा देणारे झाले आहेत ते आटणार्‍या ओहोळाच्या पात्राप्रमाणे झाले आहेत;


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको.


मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.


गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल,


तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत;


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.


अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


मला वनात वाटसरूंसारखे बिर्‍हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


आपापल्या शेजार्‍याविषयी सावध असा. कोणाही बंधूचा विश्वास धरू नका; कारण प्रत्येक बंधू खास ठकवतो, प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो.


जो तो आपल्या शेजार्‍याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.


भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;


तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.


कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.


तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली.


नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan