Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणाहून आले आहेत, कारण परमेश्वराची तलवार एका सीमेपासून देशाच्या तुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी देशात सुरक्षितता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 उजाड वाळवंटाच्या टोकांवर संहार करणारे झुंडीने येतील, कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 12:12
31 Iomraidhean Croise  

परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे.


दुर्जनांना शांती नाही असे माझा देव म्हणतो.”


ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’


कारण परमेश्वर म्हणतो की : शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.


उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे, इस्राएलवंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे; कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे, ते आपला देव परमेश्वर ह्याला विसरले आहेत.


“परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.


परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही.


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


हे परमेश्वराच्या तलवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. विराम पाव व स्वस्थ राहा!


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे.


मी देशावर तलवार आणून म्हटले की, अगे तलवारी, देशावर फीर आणि तिने मनुष्य व पशू ह्यांचा संहार केला;


हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.


मी तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकणार, ह्यास्तव माझी तलवार म्यानातून निघून दक्षिणोत्तर सर्व मानवजातीवर चालेल;


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग; परमेश्वर असे म्हणतो, तलवार, पाणी दिलेली, पाजवलेली तलवार!


नगराच्या वेढ्याचे दिवस संपले म्हणजे ह्या केसांचा एक तृतीयांश नगराच्या मध्यभागी अग्नीने जाळून टाक; एक तृतीयांश केस घेऊन त्यांवर चोहोकडून तलवार चालव आणि उरलेला एक तृतीयांश वार्‍यावर उडव; ह्या प्रकारे मी तलवार उपसून त्या लोकांची पाठ पुरवीन.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”


अहो कूशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.


वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’


तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan