Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 12:10
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


तुझ्या पवित्र लोकांनी केवळ थोडा काळ वतन भोगले; आमच्या शत्रूंनी तुझे पवित्रस्थान तुडवून टाकले आहे.


“जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करतात व त्यांना विखरतात ते हायहाय करतील!” असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत.


तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्‍या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.”


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रांतील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते; तुम्ही मला, माझ्या बापा, असे म्हणाल, मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते.


बाबेलच्या राजाचे सर्व सरदार म्हणजे नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे वरकड सरदार हे सर्व मधल्या वेशीत येऊन बसले.


मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल.


मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.


“मानवपुत्रा, इस्राएलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो : जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?


त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.


तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्‍यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?”


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा;


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan