यिर्मया 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ” Faic an caibideil |
मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.
आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.