Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अनाथोथच्या लोकांबद्दल परमेश्वर या गोष्टी म्हणतो, जे तुझा जीव घेण्यास पाहत आहेत. ते म्हणातात, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला आमच्या हाताने ठार करु.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:21
22 Iomraidhean Croise  

ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


ती वचने सर्व लोकांना कळवावीत म्हणून यिर्मयाला परमेश्वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयाला पकडून म्हटले, “तू मेलाच पाहिजेस.


पाहा, तुझा चुलता शल्लूम ह्याचा पुत्र हानामेल तुझ्याकडे येऊन म्हणेल, ‘अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे.’


त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन. म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


“तरीपण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पाजला व संदेष्ट्यांना ‘संदेश देऊ नका’ अशी आज्ञा केली.


कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत.


भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;


तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला.


आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले.


पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan