यिर्मया 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तथापि हे सत्य न्याय करणार्या, अंतर्याम व हृदय पारखणार्या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत. Faic an caibideil |
हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.