Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:19
28 Iomraidhean Croise  

त्याचे मोल मानवाला कळत नाही; ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही.


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.


हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस, जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस.


ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील.


कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली.


मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.


परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्‍यातून खेचून काढील, व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. (सेला)


ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;


तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो.


ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.


मी म्हटले, मला परमेशाचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेशाचे दर्शन होणार नाही; मी जगातील रहिवाशांसह राहून2 मनुष्य माझ्या दृष्टीस इत:पर पडणार नाही.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


ती वचने सर्व लोकांना कळवावीत म्हणून यिर्मयाला परमेश्वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयाला पकडून म्हटले, “तू मेलाच पाहिजेस.


त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत.


तेथे एलाम आहे व तिचा सर्व समुदाय तिच्या कबरेसभोवती आहे; जे जिवंतांच्या भूमीस दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत; ते बेसुंती अधोलोकी गेले आहेत; गर्तेत उतरणार्‍यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत.


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे; संदेष्टा आपल्या सर्व मार्गांत पारध्याचा फासा आहे; त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे.


गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;


Lean sinn:

Sanasan


Sanasan