Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सर्वसमर्थ याहवेह, ज्यांनी तुमचे रोपण केले, त्यांनी तुमचा सर्वनाश करण्याची आज्ञा दिली आहे, कारण इस्राएल व यहूदीया या दोन्ही लोकांनी दुष्टपणा केला आहे आणि बआलापुढे धूप जाळून माझा क्रोधाग्नी भडकविला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:17
33 Iomraidhean Croise  

मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.


त्याने यहूदाच्या प्रत्येक नगरात अन्य दैवतांना धूप जाळण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.


मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.


तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, मी त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही; ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.


हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.


तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस.


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.


यहूदाचा राजा हिज्कीया व सर्व यहूदा ह्यांनी त्याला ठार केले काय? त्याने परमेश्वराचे भय धरून परमेश्वराचा प्रसाद मागितला नाही काय? त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे परमेश्वराने म्हटले होते त्याविषयी त्याला अनुताप झाला, तर मग अशाने आपण आपल्या जिवांची मोठी हानी करीत आहोत.”


आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील.


कारण इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज ह्यांनी तरुणपणापासून माझ्या दृष्टीने अगदी वाईट ते केले; इस्राएलाचे वंशज आपल्या हातच्या कर्मांनी केवळ मला संतापवत आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”


गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट ह्या स्थळावर येईल असे जाहीर केले;


परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.


ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.


तरीपण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकेनात व आपला कान देईनात.


कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


मुलेबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवतात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांना पेयार्पणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणीक तिंबतात; असे ते मला क्रोधास पेटवतात.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


त्याने देशातले काही बी घेऊन ते पिकाऊ जमिनीत पेरले; वाळुंज लावतात तसे ते विपुल पाण्याजवळ लावले.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan