Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, आणि त्याच्या फांद्या मोडून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:16
18 Iomraidhean Croise  

तो सूर्यप्रकाशात टवटवीत होतो. त्याच्या फांद्या बागभर पसरतात.


मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.


ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;


कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल.


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.


तुझ्या सार्‍या प्रदेशात तुझे जैतुनवृक्ष असतील, पण तुला त्यांचे तेल अभ्यंग करायला मिळणार नाही; कारण त्यांची फळे गळून पडतील.


‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan