Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझ्याशी कपटाने वागणार्‍या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 “माझ्या प्रिय लोकांनी, ज्यांनी इतके दुष्ट हेतू धरले आहेत, ते माझ्या घरात का आहेत? कारण तुझ्या अर्पणाचे मांस तुझा बचाव करु शकणार नाही, कारण तू वाईट केले आणि नंतर आनंद केला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे? इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का? तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का? जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता, तेव्हा तुम्ही आनंदित होता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:15
29 Iomraidhean Croise  

दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?


तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.


मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात;


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


जो आपल्या शेजार्‍याला फसवतो आणि म्हणतो की, “मी थट्टा नव्हतो का करीत?” तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणार्‍या वेड्यासारखा आहे.


नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.


परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.


“मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.


तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


“कारण संदेष्टा व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत; माझ्या मंदिरातदेखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


मग राजा जेवणार्‍यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.


तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”


सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.


ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते;


शुद्ध जनांस सर्वकाही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत.


आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan