Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 यहूदातील शहरे व यरूशलेममधील रहिवासी ज्यांना ते अर्पणे देत असत, आणि धूप जाळीत असत, असे ते त्यांच्या देवांकडे आरोळी करतील, पण त्या भयंकर संकटकाळी लोकांस मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:12
10 Iomraidhean Croise  

संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.


मग तो म्हणेल, ‘त्यांचे देव कोठे आहेत? ज्याच्यावर त्यांनी भिस्त ठेवली तो त्यांचा दुर्ग कोठे आहे?


त्यांच्या यज्ञातली चरबी खाणारे, त्यांच्या पेयार्पणातला द्राक्षारस पिणारे देव कोठे आहेत? त्यांनी आता उठून तुम्हांला साहाय्य करावे व तुम्हांला आश्रय द्यावा.


जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan