Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांसच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:5
16 Iomraidhean Croise  

मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.


तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याच्याकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “ज्या मूर्तींना आपल्या लोकांस तुझ्या हातातून सोडवता आले नाही त्यांच्या भजनी तू का लागलास?”


मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत.


ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.


तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हांला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.


आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”


तेथे तुम्ही मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ-पाषाणादिकांचे देव, जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत व हुंगत नाहीत अशांची सेवा कराल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan