Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो सोन्यारुप्याने ते भूषित करतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; ती एका जागी स्थिर रहावी, पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:4
9 Iomraidhean Croise  

त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.


राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.


लोहार छिन्नी पाजवतो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणतो, तो आपल्या बाहुबलाने ती घडतो; त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते; तो पाणी प्याला नाही तर व्याकूळ होतो.


जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;


ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan