Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांस पुढील संराष्ट्र द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:11
14 Iomraidhean Croise  

कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती1 आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.


मूर्ती तर अगदी नाहीतशा होतील.


तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.


त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.


शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.


तो मिसर देशातले जे बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील.”’


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


त्या शून्यरूप असून, उपहासाला पात्र अशा वस्तू होत; त्यांचा समाचार घेतेवेळी त्या नष्ट होतात.


तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील, व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन.


त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


दुसर्‍या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan