Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो, तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे; आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:5
26 Iomraidhean Croise  

मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.


मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखत आहे.”


परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस.


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला,


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


परमेश्वराचे वचन मला आले ते असे :


“तुला पुत्र झाला” हे वर्तमान माझ्या बापाला कळवून त्याला फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो.


मी त्या देशाविषयी जी वचने बोललो आहे, आणि सर्व राष्ट्रांविषयी यिर्मयाने ह्या संदेशग्रंथात जे लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्वकाही त्या देशावर आणीन.


“तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.


त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तो त्यांच्या पक्षाने लढेलच, म्हणजे मग तो पृथ्वीला विसावा देईल, पण बाबेलच्या रहिवाशांना घाबरे करील.


कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.


तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली;


आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील;


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?


पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :


कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.


जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1


त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan