Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू तर आपली कंबर कस; ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग; त्यांना घाबरू नकोस; घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:17
26 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.


परमेश्वराचा देवदूत एलीयाला म्हणाला, “खाली उतरून त्याच्याबरोबर जा; भिऊ नकोस.” तेव्हा एलीया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला.


तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी हाती घेऊन नीघ; वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नकोस; कोणी सलाम केल्यास त्याला उलट सलाम करू नकोस. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव.”


नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा.


आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला हे विचारतो; मला सांग.


देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”


जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल; तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की, तू इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ दे.


पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो.


माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


मग यिर्मया सर्व सरदारांना व सर्व लोकांना म्हणाला, “जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व ह्या मंदिराविरुद्ध व ह्या नगराविरुद्ध सांगावीत म्हणून परमेश्वराने मला पाठवले.


“परमेश्वर म्हणतो : परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, व यहूदाच्या सर्व नगरांतून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करण्यास येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग, एकही शब्द गाळू नकोस.


यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे नेरीयाचा पुत्र बारूख ह्याने सर्वकाही केले; त्याने परमेश्वराची वचने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथातून वाचून दाखवली.


मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.


“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”


तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या;


जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही.


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan