Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. ते तटाच्या सर्व बाजूला व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:15
24 Iomraidhean Croise  

असे झाले आहे की तुझी उत्कृष्ट खोरी रथांनी भरली आहेत, व वेशीसमोर घोडेस्वार रांग धरून उभे आहेत;


ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


“उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?


जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


परमेश्वर म्हणतो, ह्या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, ‘हे ओसाड आहे, ह्यात माणसे व पशू ह्यांचा मागमूस नाही; यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांत माणसे, रहिवासी व पशू ह्यांचे नाव नाही;’


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक ह्यांनी यरुशलेमेबरोबर व तिच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालवले, तेव्हा यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा करून त्यांना ह्या नगराकडे परत यायला लावीन; ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळतील; मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन.”


बाबेलच्या राजाचे सर्व सरदार म्हणजे नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे वरकड सरदार हे सर्व मधल्या वेशीत येऊन बसले.


ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.


सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.


आणि त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, माझा सेवक नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी लपवून ठेवले आहेत त्यांवर त्याचे सिंहासन ठेवीन; मग तो त्यांवर आपला भव्य गालिचा पसरील.


ह्यामुळे माझा संताप व क्रोध ह्यांचा वर्षाव झाला, तो यहूदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या ह्यांत पेटला; ती ओसाड व वैराण झाली आहेत हे आज दिसत आहे.


मिसरकन्येची अब्रू गेली आहे; तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले आहे.”


परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.


परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.


उत्तरेकडील सरदार व वधलेल्यांबरोबर उतरून गेलेले सीदोनी हे सर्व तेथे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा वचक बसला होता तरी त्यांची अप्रतिष्ठा झाली; ते बेसुंती लोक तलवारीने वधलेल्यांबरोबर पडले आहेत व गर्तेत उतरणार्‍यांबरोबर अप्रतिष्ठा पावले आहेत.


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्‍चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan