Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:12
15 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.


परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”


परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “अंजीर; चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाहीत.”


आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.


कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”


ह्याकरता त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तो म्हणाला, आमोसा, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “पक्‍व फळांची पाटी.” मग परमेश्वर म्हणाला, “माझे लोक इस्राएल ह्यांचा अंतसमय आला आहे; ह्यापुढे मी त्यांची गय करणार नाही.”


त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”


तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.”


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘हे लोक म्हणतात ते ठीक आहे.


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


तुम्ही मला असे सांगत असताना परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले; आणि परमेश्वर मला म्हणाला, ‘ह्या लोकांचे तुझ्याशी झालेले बोलणे मी ऐकले आहे; त्यांनी जे काही म्हटले ते बरोबर म्हटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan