Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी अबीमलेखाला बआल-बरीथच्या घरातून सत्तर रुपये दिले; ह्या पैशांनी त्याने रिकामटेकड्या व बेदरकार लोकांना पदरी ठेवले व ते त्याच्याबरोबर चालायला लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांनी त्यास बआल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांनी त्याला बआल-बरीथ मंदिरातील सत्तर शेकेल चांदी दिली आणि अबीमेलेखाने ती अविचारी व लुच्ची माणसे त्याच्यामागे चालण्यासाठी उपयोगी आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 9:4
11 Iomraidhean Croise  

आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.


ते मूढांचे किंबहुना अधमांचे वंशज आहेत; त्यांना देशातून हाकून दिले आहे.


जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.


तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.


परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.


तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले.


गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने बआल देवाच्या नादी लागले; त्यांनी बआल-बरीथ1 ह्याला आपला देव केले.


त्यांनी शेतात जाऊन द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडून व तुडवून त्यांचा रस काढला आणि उत्सव केला. आपल्या देवाच्या मंदिरात जाऊन मेजवानी केली व अबीमलेखाला शिव्याशाप दिले.


विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan