Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 9:1
13 Iomraidhean Croise  

याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला.


तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.


रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.


यराबाम परत आला हे सर्व इस्राएलांनी ऐकले तेव्हा त्यांनी त्याला बोलावणे पाठवून सभेस बोलावले व सर्व इस्राएलावर राजा केले; यहूदाच्या वंशाखेरीज दाविदाच्या घराण्याला कोणी धरून राहिला नाही.


आणि लोकांनी त्याला बोलावून आणले; तेव्हा यराबाम व इस्राएलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली,


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.


ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.


गिदोनाला स्वतःचे सत्तर मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या.


शखेमात त्याची एक उपपत्नी होती; तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अबीमलेख असे ठेवले.


तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्राएलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शवली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan