Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा तो सुक्कोथ येथल्या लोकांना म्हणाला, “कृपया माझ्याबरोबरच्या लोकांना भाकरी द्या, कारण ते थकून गेले आहेत आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना ह्यांचा मी पाठलाग करत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, “माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपा करून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तो सुक्कोथ येथील लोकांना म्हणाला, “मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्याबरोबरच्या लोकांना काही भाकरी द्या; कारण ते फार थकले आहेत आणि मी मिद्यानी लोकांचे राजे जेबह व सलमुन्नाचा आताही पाठलाग करीत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 8:5
11 Iomraidhean Croise  

आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता.


पण याकोब मजल दरमजल करत सुक्कोथास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या; म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ (खोपट्या) असे पडले.


देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;


कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.


परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या. त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करायला, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करायला ते आले नाहीत.


जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.


जेबह व सलमुन्ना हे पळाले तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला; त्याने जेबह व सलमुन्ना हे मिद्यानाचे दोन राजे पकडले आणि सर्व सैन्याची गाळण उडवली.


मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, “तुम्ही माझी थट्टा केली होती ना की, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या थकल्याभागल्या लोकांना अन्न द्यावे! तर हे बघा जेबह व सलमुन्ना.”


तेव्हा अबीगईल हिने त्वरेने दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे हुरडा, खिसमिसांचे शंभर घड आणि अंजिराच्या दोनशे ढेपा हे सर्व घेऊन गाढवांवर लादले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan