Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 7:9
23 Iomraidhean Croise  

ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,


असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.


ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.”


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”


मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”


ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.”


आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.”


त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.


तो त्यांना म्हणाला, “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.” तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.


तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा.


मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली; त्याने बाकीच्या सर्व इस्राएल लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे पाठवून दिले, पण त्या तीनशे लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोर्‍यात होती.


योनाथान म्हणाला, “पाहा, आपण त्या माणसांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू.


दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्‍न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan