शास्ते 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.” Faic an caibideil |