शास्ते 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्राएल मारील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’ Faic an caibideil |
ह्या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुझ्यावाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस.”