Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 7:12
16 Iomraidhean Croise  

इकडे इस्राएल लोकही एकवट होऊन व अन्नसामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करायला गेले; इस्राएल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला; ते बकर्‍यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण अरामी लोकांनी देश व्यापून टाकला.


शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत


कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.


परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.


तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्रकिनार्‍यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले, त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.


मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;


नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.


कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.


गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्‍याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.”


जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.


तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.


तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan