Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि असे झाले की, जर इस्राएली पिकांची लागवड करीत, तर मिद्यानी व अमालेकी आणि पूर्वेकडले लोक त्यावर हल्ला करीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 6:3
25 Iomraidhean Croise  

पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले.


मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहचला.


इकडे इस्राएल लोकही एकवट होऊन व अन्नसामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करायला गेले; इस्राएल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला; ते बकर्‍यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण अरामी लोकांनी देश व्यापून टाकला.


शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली.


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


तर मी पेरले ते दुसरा खावो; लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकोत;


मग अमालेक येऊन रफीदीम येथे इस्राएल लोकांशी लढू लागला.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


अम्मोन वंशजांना म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा तू ‘वाहवा’ असे म्हटलेस;


म्हणून पाहा, मी पूर्वेकडील लोकांना तुझा ताबा देईन, ते तुझ्यात छावणी करून राहतील व आपली घरे बांधतील; ते तुझ्यातली फळे खातील व तुझे दूध पितील.


तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील.


तू पेरशील, पण कापणी करणार नाहीस; तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस; द्राक्षीचा उपज तुडवशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस.


तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ते खाऊन टाकतील; तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स ते तुला लाभू देणार नाहीत.


तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का?


तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले.


मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.


नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.


आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत.


त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.


जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan