Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 6:2
12 Iomraidhean Croise  

उदासवाण्या खोर्‍यात, जमिनीच्या विवरात व कपारीत त्यांना राहावे लागते.


इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.


मवाबाच्या रहिवाशांनो, नगरे सोडून द्या व कड्यांतून वस्ती करा; कपारीच्या बाजूला कोटे करणार्‍या पारव्यासारखे व्हा.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.


‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’


यार्देनेच्या पलीकडे अमोर्‍यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला.


अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्‍या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते.


मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;


आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले.


मग ते दोघे पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले; तेव्हा पलिष्टी म्हणाले, “पाहा, इब्री लोक बिळात लपून राहिले होते ते आता बाहेर पडत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan