Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 5:4
13 Iomraidhean Croise  

त्यांना त्याने आज्ञा दिली की, “माझा स्वामी एसाव ह्याला जाऊन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाकडे उपरा असा जाऊन राहिलो होतो.


तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात.


हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास; तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलेस.


मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले.


तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.


ज्यांच्यावर तू कधी राज्य केले नाहीस, ज्यांना तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत.


अग्नीपुढे मेण वितळते अथवा उतरणीवर ओतलेले पाणी वाहते, तसे पर्वत त्याच्या खाली विरघळतात व खोरी फाटतात.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan