शास्ते 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
9 ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
9 ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
9 दबोराने उत्तर दिले, “मी तुजबरोबर अवश्य येईन, परंतु जो मार्ग तू घेत आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण याहवेह सिसेराला एका स्त्रीच्या हातात देतील.” मग ती बाराकासोबत केदेश येथे गेली.
त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलावून म्हटले, “आपली तलवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जिवे मारले असे लोक म्हणतील.” त्या तरुणाने त्याला भोसकले तेव्हा तो मरण पावला.
ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.