Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 4:6
21 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’


आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.


सहावी चिठ्ठी नफतालीची म्हणजे नफतालीच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.


त्यातील तटबंदीची नगरे ही : सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;


केदेश, एद्रई व एन-हासोर;


नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.


बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.


त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गाइलेले गीत हे :


आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले.


मग त्याने जेबह व सलमुन्ना ह्यांना विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच होते. ते सगळे राजकुमारांसारखे होते.”


मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल, तेथे तीन माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील, त्यांतल्या एकाच्या हातात तीन करडे, दुसर्‍याच्या हातात तीन भाकरी आणि तिसर्‍याच्या हातात एक द्राक्षारसाचा बुधला असेल.


ह्यावर परमेश्वराने यरुब्बाल, बदान, इफ्ताह व शमुवेल ह्यांना पाठवून तुम्हांला तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातांतून सोडवले व तुम्ही निर्भय राहू लागला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan