Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 4:5
18 Iomraidhean Croise  

रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.


दुसर्‍या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते.


त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो.”


तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने.


ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.


परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”


मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;


बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,


गिबोन, रामा व बैरोथ;


त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली.


दाविदाचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा पत्ता लागला आहे असे शौलाने ऐकले; त्या वेळी तो गिबा येथे एका उच्च जागी चिंचेच्या झाडाखाली हातात आपला भाला घेऊन बसला होता व त्याचे सर्व सेवक त्याच्या सभोवती उभे होते.


पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan