Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्याच्याजवळ नऊशे लोखंडी रथ होते आणि त्याने क्रूरतेने वीस वर्षे इस्राएली लोकांचा छळ केला, त्यांनी मदतीसाठी याहवेहचा धावा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 4:3
19 Iomraidhean Croise  

त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले; ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा शोध करू लागले; ते देवाकडे वळून अनन्यभावे त्याला शरण गेले.


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


तुझ्या भूमीचे उत्पन्न व तुझ्या सार्‍या श्रमाचे फळ तुला अपरिचित असलेले राष्ट्र खाऊन टाकील आणि तुझा निरंतर छळ होऊन तू रगडला जाशील.


तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”


यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडवणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठवला.


इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.


तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशे लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.


त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?


मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.


इस्राएल लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्याचे थांबवू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan