Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




शास्ते 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




शास्ते 3:3
31 Iomraidhean Croise  

जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल.


नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.


शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी त्या वेळी महोत्सव केला, हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्राएल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर चौदा दिवस आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उत्सव करीत राहिला.


अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्या इस्राएल नसलेल्या लोकांतले अवशिष्ट लोक,


पश्‍चिम सीमा ही : दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र; ही पश्‍चिम बाजू झाली.


नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्‍यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.”


आणि होर पर्वतापासून हमाथाच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी.


तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा.


(हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.)


गिबोनात राहणार्‍या हिव्व्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,


आणि पूर्वेकडले व पश्‍चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठवले.


(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);


आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन.


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”


तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का?


म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले.


पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही. त्या काळी इस्राएलावर पलिष्ट्यांची सत्ता होती.


मग ते पाच पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की, तेथील लोक सीदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्‍चिंत आहेत; अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत; ते सीदोनी लोकांपासून दूर राहत असून अरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही.


आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही :


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.


पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरशंभर व हजारहजार योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस आखीशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला.


हे पाहून पलिष्ट्यांचे पाच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.


ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या पाच सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते; ती धोंड यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात आजपर्यंत आहे.


ते म्हणाले, “त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते?” ते म्हणाले, “पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan